Mumbai: धक्कादायक! धारावी परिसरात मुलाने केली आईच्या प्रियकराची हत्या
मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दिपक खटरमोल असं या आरोपी मुलाचं नाव आहे. दिपकला आपल्या आईचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.
Mumbai: मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरातून अत्यंत धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या (Murder) केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दिपक खटरमोल असं या आरोपी मुलाचं नाव आहे. दिपकला आपल्या आईचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने या व्यक्तीची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक हा सायन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन विभागामध्ये काम करतो.
दिपकला काही दिवसांपूर्वी आपल्या आईचे सचिन कुंचीकुर्वे नावाच्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचं समजलं होतं. त्यानंतर रविवारी दिपकला आपल्या घरी सचिन कुंचीकुर्वे दिसला. त्यानंतर दिपक आणि सचिन यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. या वादात दिपकने सर्जिकल ब्लेडच्या साहाय्याने सचिनचा गळा कापला. यात सचिनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ओरोपी दिपक आणि त्याच्या आईने घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - Pune Murder Case: कर्जदारांपासून सुटका मिळण्यासाठी स्वत: च्या मृत्यूचं नाटक रचून आरोपीने केली मित्राची हत्या; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण)
या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपासणी केली असता केवळ काही तासातचं आरोपीला अटक करण्यात आली. (हेही वाचा - Mumbai: मालाड मधील अक्सा बीचवर आढलेल्या महिलेच्या मृत्यूचे गुढ उकलण्याची शक्यता, पोलीस करतायत नवऱ्याच्या चौकशीची प्रतिक्षा)
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात अशाचं स्वरुपाची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधात आठकाठी असणाऱ्या मुलाची आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने डोक्यात दगड घालून हत्या केली. मुक्ताबाई सुभाष जाधव, असं या आरोपी महिलेचं नाव आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2020 11:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

