Bihar: सुकलेले कपडे काढण्यासाठी अंगणात आलेल्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील घटना

सुकलेले कपडे काढण्यासाठी अंगणात आलेल्या तरुणीचे काही नराधमांनी अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी तलावाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. मुझफ्फरपूरमधील कांती पोलिस स्टेशन भागात ही घटना घडली.

Bihar: सुकलेले कपडे काढण्यासाठी अंगणात आलेल्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील घटना
Gang Rape | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bihar: बिहारमधील मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सुकलेले कपडे काढण्यासाठी अंगणात आलेल्या तरुणीचे काही नराधमांनी अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला. पीडित तरुणी तलावाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. मुझफ्फरपूरमधील कांती पोलिस स्टेशन भागात ही घटना घडली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित मुलगी बेपत्ता झाली होती. बुधवारी सकाळी ती एका तलावाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पीडितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची माहिती मिळताचं कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.

कुटुंब आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासात कांती आणि महिला पोलिस ठाण्याचे पोलिस गुंतले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या एएसआय हरीवल्‍लभ कुमार यांनी सांगितलं की, तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पीडितेच्या नातेवाईकांची फिर्याद नोंदवण्यात येत असून त्यानंतर गुन्हा नोंदविला येईल, असंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा - Latur: धक्कादायक! लातूरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार; पीडितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या)

दरम्यान, पीडितेच्या आईने सांगितले की, रात्री दहाच्या सुमारास सुकलेले कपडे काढून खोलीत आणण्यासाठी ती घराच्या अंगणात गेली. त्याचवेळी काही लोकांनी तिचे तोंड दाबून अपहरण केले. त्यानंतर आम्ही तिचा शोध घेतला. परंतु, ती कोठेही सापडली नाही. त्यानंतर आम्हाला सकाळी पाच वाजता तलावाजवळ मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर आम्ही पोलिसांना संपर्क केला.

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2020 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).