Representational Picture (photo credit- File image)

Kalyan News: सोशल मीडियावरचा वापर करत लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात.तसच काहीस चित्र कल्याण मध्ये घडलं. काही दिवसांपुर्वी इन्स्टाग्रामवर मित्र झालेल्या २३ वर्षीय व्यक्तीने एका मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. कल्याण पोलीस ठाण्या अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण स्थानकावर 18 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. आरोपीने 17 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना कल्याण मध्ये घडली. पोलिसांना ही माहिती मिळताच, आरोपीच्या ताब्यातून मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांना एक मुलगी लापता असल्याची माहिती मिळाली.

एक मुलगी लापता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी शोधाशोध सुरु केला. मुंबईतील धारावी येथील रहिवासी असलेली ही तरुणी सोलापूरहून गदग एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होती. पोलिसांनी नंतर तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मुलगी ट्रेनमधून खाली उतरताना आणि कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एकटी फिरताना दिसली,पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने तपास केला. पोलीसांनी तिला शोधण्यासाठी पथके नेमली.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एका गावातील एका व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक कर्जतमधील आरोपीच्या घरी पोहोचले. तेथून मुलीला ताब्यात घेतले.

मुलीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी कुणाल रवींद्र रातंबे याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली . प्राथमिक तपासात ही मुलगी आणि आरोपीची इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.