Dog | (Photo Credits: x/ANI)

ध्वनी आणि वायुप्रदुषण ही जागतिक समस्या बनली असून यामुळे मानवासह प्राण्यांना देखील यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. मानवासह प्राण्यांच्या आयुष्यावर देखील प्रदुषणाचा मोठा परिणाम हा होत आहे. अस्थमा आणि फुफ्फुसे काळी पडण्याचे आजार आढळून आले आहेत. तसेच परिसरातील कुत्र्यांचं आयुष्य 3 ते 4 वर्षांनी घटल्याची बाब एका रिसर्चमध्ये समोर आली आहे. हवेत मिसळलेले कार्बनचे घटक फुफ्फुसाला बाधा पोहोचवतात. त्यामुळे फुफ्फुसे निकामी होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.  ( Mumbai AQI Update: मुंबईत अवकाळी पावसामुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशकात सुधारणा)

सध्या  धुक्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लोक सकाळी लवकर घराबाहेर पडतात. अशावेळी अनेक जण पाळीव कुत्र्यांना सोबत घेतात. मात्र ही मंडळी स्वत: सोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचेही आरोग्य धोक्यात घालत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार, पहाटे जे धुकं पसरलेलं असतं, ते आरोग्याला धोका पाहोचवणारं वायुप्रदुषण असल्याचं मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका मृत भटक्या कुत्र्याचं शवविच्छेदन नुकताच करण्यात आलं होतं, त्यात त्याचं फुफ्फुस कार्बनमुळे काळं पडून त्याचा मृत्यू झालंचं समोर आलं आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला.

महामार्ग आणि ज्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते, अशा ठिकाणी आढळणाऱ्या कुत्र्यांचं आयुर्मान 3 ते 4 वर्षांनी घटल्यांचं रिसर्चमधून समोर आले आहे. पाळीव प्राणी, पक्ष्यांना सूर्य उगवल्यानंतर घराच्या बाहेर फिरायला घेऊन जायला हवं. कारण उन्हामुळे वातावरणातील कार्बनुयक्त फॉग वर निघून जातो. त्यामुळे वातावरण थोड्या प्रमाणात शुद्ध होण्यास मदत होते.