ठाणे येथील एका उच्चभ्रू इमारतीत (Elite Society in Thane) राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारली आहे. धक्कादायक म्हणजे इमारतीवरुन उडी मारलेला हा अल्पवयी मुलगा उच्चभ्रू कटुंबातील (High Profile Family) आहे. नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी परीक्षेत (Class 10th Exam) त्याने 92% गुण मिळवले होते. पाठिमागच्याच आठवड्यात बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर या मुलाने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले. ठाणे शहरातील ठाण्यातील वर्तक नगर (Vartaknagar) परिसरात ही घटना घडली.
रात्री दोनच्यासुमारास मोठा आवाज आल्याने इमारतीतील रहिवासी अचानक सतर्क झाले. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत घटनास्थळ गाठले तेव्हा त्यांना एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलाने नैराश्येतून हे कृत्य केले असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, वास्तवात काय घडले याबाबत पोलीस तपासात माहिती पुढे येऊ शकणार आहे. (हेही वाचा, MHT CET Result 2023 Declared: एमएचटी सीईटी निकाल जाहीर; www.mahacet.org आणि www.mahacet.in वरुन कसे डाऊनलोड कराल PCB, PCM गुणपत्र)
किशोरवयीन विद्यार्थ्यांमधील नैराश्य ही एक महत्त्वाची समस्या ठरत चालली आहे. नैराश्येची समस्या ही विद्यार्थ्यांच्या कल्याणावर, शैक्षणिक कामगिरीवर आणि सर्वांगीण विकासावर खोलवर परिणाम करू शकते. पौगंडावस्था हा महत्त्वपूर्ण शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदलांचा काळ आहे. त्यामुळे या काळात विद्यार्थी, तरुण यांच्यामध्ये अभ्यास, एकटेपणा, सामाजिक स्थित्यांतरे, शारीरिक बदल यातून येणारा ताण आणि दुःख, मूड बदलणे किंवा तणावाचा काळ अनुभवणे अशा आवस्थेतून जावे लाते. कधी कधी उदासीनता दुःखाच्या तात्पुरत्या भावनांच्या पलीकडे जाते. अशा वेळी या तरुणांशी, मुलांशी आपूकीने बोलणे, समजून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. मुलांना आपलेपणा मिळाला नाही तर ते भयानक पाऊल उचलण्याचीही शक्यता असते असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात.