सातारा (Satara Accident) जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar Accident) येथे मजुरांच्या टेम्पोला भीषण अपघात (Accident) घडल्याचे वृत्त आहे. महाबळेश्वर येथील मुगदेव (Mugdev) परिसरात घडलेल्या अपघातावेळी टेम्पोमध्ये 50 मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. टेम्पोतील सर्व मजूर मुंंबई येथून आले होते. ते मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील गावाजवळ कामासाठी निघाले होते, अशी माहिती आहे. दरम्यान, अपघाता कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मदत आणि बचाव कार्य सुरु सुरु आहे.
मुगदेव येथील दरीत कोसळून टेम्पोचा अपघात घडला. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. तसेच, अपघातग्रस्त मजूर हे नेमके कोणत्या कामासाठी निघाले होते. त्यासाठी कोणी कंत्राट घेतले होते की, हे मजूर स्वत:च कामाच्या शोधात निघाले होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. (हेही वाचा, Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?)
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याअपघातामुळे मजुरांच्या वाहतूकीचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कोणत्याही प्रकारची मानवी वाहतूक करायची असेल तर त्यासाठी बस, कार अथवा रिक्षा यांसारखे रस्तेवाहतुकीचे पर्याय असतात. केवळ गुड्स कॅरीअर म्हणजे मालवाहतूक करायची असेल तरच ट्रक, टेम्पो यासारखे पर्याय वापरतात. त्यामुळे टेम्पोतून वाहतूक आणि त्यातही इतक्या मोठ्या प्रमाणावर केलीच कशी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.