प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu Accident) यांचा आज (11 जानेवारी) सकाळी अपघात घडला. अपघात त्यांच्या डोके आणि पायाला मार लागला. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, बच्चू कडू यांनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे, असे म्हटले आहे.
आमदार बच्चू कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत म्हटले की, 'आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.' (हेही वाचा, आमदार बच्चू कडू अपघातात जखमी; डोक्याला मार, पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल)
दरम्यान, आमदार बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे बच्चू कडू हे रस्तादुभाजकावर जाऊन आदळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या उजव्या पायाला मोठी इजा झाली असून, डोक्याला चार टाकेही घालावे लागले आहेत.
ट्विट
आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 11, 2023
पाठिमागील काही दिवसांपासून आमदरांच्या अपघाताच्या घटना वारंवार घडत आहे. आगोदर आमदार जयकूमार गोरे यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघाताच्या वृत्ताच्या बातम्या थांबतात न थांबतात तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला. आता बच्चू कडू यांच्या अपघाताचे वृत्त आले आहे. दरम्यान मराठा सेवा संघाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात नुकतेच निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र हादरला होता.