Bacchu Kadu Accident: आमदार बच्चू कडू अपघातात जखमी; डोक्याला मार, पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल
Bacchu Kadu Accident News : आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला. जखमी अवस्थेत असलेल्या कडू यांना अमरावती (Amravati) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Bacchu Kadu Accident News : आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला. जखमी अवस्थेत असलेल्या कडू यांना अमरावती (Amravati) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमरावती शहरात आज (11 जानेवारी) सकाळी साडेसहा वाजणेच्या सुमारास हा अपघात घडला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आमदार बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे बच्चू कडू हे रस्तादुभाजकावर जाऊन आदळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या उजव्या पायाला मोठी इजा झाली असून, डोक्याला चार टाकेही घालावे लागले आहेत. (हेही वाचा, Dhananjay Munde Road Accident: परळी मध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात; छातीला किरकोळ मार)
ट्विट
महाराष्ट्र सरकार में सहयोगी प्रहार पार्टी के अध्यक्ष बच्चू कडू को एक बाइक ने मारी टक्कर..
रास्ता पार करने के दौरान बाइक सवार ने मारी टक्कर..
इस हादसे में बच्चू कडू के सिर, आंख और पैर में आई हैं गंभीर चोटें..
अमरावती के एक अस्पताल में बच्चू कडू का इलाज जारी.. pic.twitter.com/vNRcxJ1W5H
— Vivek Gupta (@imvivekgupta) January 11, 2023
पाठिमागील काही दिवसांपासून आमदरांच्या अपघाताच्या घटना वारंवार घडत आहे. आगोदर आमदार जयकूमार गोरे यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघाताच्या वृत्ताच्या बातम्या थांबतात न थांबतात तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला. आता बच्चू कडू यांच्या अपघाताचे वृत्त आले आहे. दरम्यान मराठा सेवा संघाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात नुकतेच निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र हादरला होता.
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2023 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

