चंद्रपूर: चिमुर मधील जंगलात आढळेल्या वाघिण आणि बछड्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
Sudhir Mungantivar (File Photo)

चंद्रपूरमध्ये चिमुर येथील जंगलामध्ये एका वाघिणीसह दोन बछडी मृतावस्थेमध्ये आढळले होते. गावकर्‍यांना मेटेपार गावामध्ये हे मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी वनविभागाला त्याची माहिती दिली. त्यानंतर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रपूर येथे वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू

ANI Tweet

मृतावस्थेत सापडलेल्या वाघिणी आणि त्यांच्या बछड्यांजवळ चितळ आढळल्याने त्याचे सेवन केल्याने तिघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृत पावलेले बछडे आठ ते नऊ महिन्यांचे असल्याचे सांगितले जात आहे.