Tiger, Elephant (PC - pexels)

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या वेगवेगळ्या भागात 24 तासांत हत्ती (Elephant) आणि वाघिणी (Tigress)चे शव सापडले. यासंदर्भात वन अधिकाऱ्यानी माहिती दिली असून 'मिड डे' वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रकाशित केलं आहे. वैनगंगा नदी ओलांडून गडचिरोलीहून चंद्रपूरमध्ये दाखल झालेला हत्ती मंगळवारी सकाळी जिल्हा मुख्यालयापासून 74 किमी अंतरावर असलेल्या सिंदेवाही तहसीलच्या चिटकी गावात मृतावस्थेत आढळून आला. याबाबत मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी माहिती दिली.

काही महिन्यांपूर्वी ओडिशातून गडचिरोलीला पोहोचलेल्या पचिडर्म्सच्या कळपातील हा हत्ती होता. दरम्यान, अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी भद्रावती वन परिक्षेत्रांतर्गत कम्पार्टमेंट क्रमांक 211 मध्ये वाघिणीचे शव सापडले. प्राण्याचे दात, पंजे आणि व्हिस्कर्स शाबूत होते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही वनअधिकाऱ्याने सांगितले आहे. (हेही वाचा - Nanded Hospital Tragedy: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरूचं; 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान आणखी 7 रुग्णांचा मृत्यू)

या वर्षी जानेवारी ते 28 सप्टेंबर या कालावधीत भारतात 146 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली, जी 2012 नंतरची सर्वोच्च संख्या आहे. या वर्षी सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद मध्य प्रदेशात (34) झाली आहे, त्यानंतर महाराष्ट्रात (32) वाघांचा मृत्यू झाला. 146 वाघांच्या मृत्यूपैकी 24 शावक होते. उत्तराखंडमध्ये 17, आसाममधून 11, कर्नाटकात 9 आणि राजस्थानमध्ये 5 वाघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, या कालावधीत देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये 70 मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, 2022 मध्ये भारतात 121 वाघांचा मृत्यू झाला. NTCA डेटा नुसार 2021 मध्ये 127, 2020 मध्ये 106. 2019 मध्ये 96, 2018 मध्ये 101, 2017 मध्ये 117, 2016 मध्ये 121 2015 मध्ये 82, 2014 मध्ये 78, 2013 मध्ये 68, आणि 2012 मध्ये 88 वाघांचा मृत्यू झाला. एनटीसीएनुसार, वाघांच्या मृत्यूची कारणे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक होते. अनैसर्गिक कारणांमध्ये अपघातामुळे होणारे मृत्यू, संघर्षात मारले गेलेले वाघ यांचा समावेश होतो.