Tigress and her two cubs found dead in Chimur Forest area (Photo Credits-ANI)

चंद्रपूर (Chandrapur) येथील चिमूर(Chimur) या ठिकाणी वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृत पावलेले बछडे आठ ते नऊ महिन्यांचे असल्याचे सांगितले जात आहे.

मेटेपार गावालगत जंगलाच्या ठिकाणी एका वाघिण आणि दोन बछडे मृतावस्थेत दिसून आले. याबद्दलची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. या ठिकाणी वनाधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याची माहिती घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. (डहाणू येथे सापडला 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाचा अजगर)

तसेच काही अंतरावर एक चितळ मृताव्यस्थेत दिसून आले. तर वाघिण आणि तिच्या बछड्यांनी ते चितळ खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.