डहाणू येथे सापडला 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाचा अजगर
फोटो सौजन्य- Pixabay

डहाणू येथे एका गावात 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाचा अजगर सापडला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु वनाधिकाऱ्यांच्या मदतीने अजराची सुटका करण्यात आली आहे.

सावटा गावातील एका घराच्या आवारातून अजगराच्या मादीला पकडण्यात यश आले आहे. अजगराची मादी घराच्या मागे असलेल्या कोंबडी फस्त करत होती. त्यामुळे प्राणीमित्रांना याबद्दल संपर्क करत त्याला पकडण्यात आले आहे. (नागपूर: घराच्या छतावरील बाथरुमच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू)

त्यानंतर प्राणीमित्रांनी अजगराच्या मादीला सुरक्षितपणे लपून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर काढले. तसेच पावसाळ्याच्या वेळी सापांचा वस्तीलगत वावर असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने रहावे असे आवाहन केले आहे.