नागपूर: घराच्या छतावरील बाथरुमच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
नागपूर (Nagpur) येथील एका तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू घराच्या छतावर असलेल्या बाथरुमच्या टाकीत पडून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूर (Nagpur) येथील एका तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू घराच्या छतावर असलेल्या बाथरुमच्या टाकीत पडून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिमुरडीच्या घरतील मंडळींसह परिसरात शोककळा परसरली आहे.
वंशिका वर्मा असे मुलीचे नाव आहे. वंशिका घरात खेळत असताना अचनाक घरातील छतावर निघून गेली. तेथे गेल्यावर छतावरील बाथरुमच्या टाकीत तोल जाऊन ती त्यामध्ये पडली. मात्र काही वेळानंतर वंशिका घरता दिसत नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी घराच्या छतावरील टाकीत ती पडल्याचे दिसून आले. यानंतर तातडीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वंशिकाला मृत घोषित केले.(मुंबई: मरिन ड्राइव्ह येथे बुडालेल्या दुसऱ्या मुलाचा मृतदेह हाती)
वंशिका हिचे वडील मजुरीचे काम करतात. तर तिची आई परिवारासोबत राहत नाही. या धक्कादायक प्रकारानंतर सर्वांना अश्रू अनावर झाले असून वंशिकाच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2019 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

