मुंबई: मरिन ड्राइव्ह येथे बुडालेल्या दुसऱ्या मुलाचा मृतदेह हाती
Marine Drive in Mumbai (Photo Credit: IANS/File Photo)

मुंबईच्या (Mumbai) मरिन ड्राइव्ह (Marine Drive) येथे काल (6 जुलै) दोन मुलं बुडाली होती. त्यापैकी एका मुलाचा मृतदेह कालच हाती लागला. मात्र त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध सुरु होता. आज (7 जुलै) रोजी दुसऱ्या मुलाचा मृतदेह देखील हाती लागला आहे. साहिल रशिद खान असे या मृत मुलाचे नाव असून तो 12 वर्षांचा होता. (मरिन ड्राईव्ह येथे बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरु)

ANI ट्विट:

भरतीमुळे ही दोन्हीही मुलं समुद्रात बुडाली आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी मज्जा मस्ती करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.