Mumbai Local Open To Students: अंतिम वर्ष आणि स्पर्धा परीक्षेला जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यास परवानगी; आयडी, हॉल तिकीटवरुन मिळणार स्थानकात प्रवेश
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai Local Open To Students: अंतिम वर्ष (Final Year Exams) आणि स्पर्धा परीक्षेला जाणाऱ्यांना (Competitive Exams) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना मुंबई उपनगरातील लोकलने (Mumbai Suburban Services) प्रवास करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांना आयडी आणि हॉल तिकीटवरुन (I-Cards & Hall Tickets) स्थानकात प्रवेश मिळणार आहे. यासंदर्भात मध्ये रेल्वेच्या पीआरओने माहिती दिली आहे.

कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरातील लोकल रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू होती. परंतु, आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे शहरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात आता विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचा अहवाल प्राप्त होताच त्यावर विचार केला जाईल. आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. (हेही वाचा - Amruta Fadnavis On Eknath Khadse: खात्री बाळगा, अशी चूक करणार नाही; अमृता फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांना टोला)

अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलता येतील, पण सरसकट रद्द करता येणार नाही, परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचा आदर करून महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांतील अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं होतं.