प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कांद्याच्या दरांनी आता शंभरी पार केल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. तर अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढत चालल्याने कोणी खरेदी करण्यासाठी पुढे येत नाही आहे. तर दर कमी करण्यासाठी सरकारकडून पण प्रयत्न केले जात आहे पण तरीही किंमतीत वाढ होत आहे. याच परिस्थितीत सोलापूर येथील बाजारात कांद्याचे दर 200 रुपयांच्यावर गेले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून कांदा खरेदी करायचा की नाही असा पेच निर्माण झाला आहे. त्याचसोबत तमिळनाडू येथील मदुराई मध्ये कांद्ये 200 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

कांद्याचे दर वेगाने वाढत चालले असून सोलापूर येथील व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, या महिन्याच्या अखेर पर्यंत कांद्याच्या किंमतीत वाढ होत राहणार आहे. तर अन्य राज्यातील बाजारात सुद्धा कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. नाशिक येथील लासलगाव APMC मध्ये नव्या कांद्याचे घाऊक किंमत 100 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. तसेच सरासरी किंमत 70 रुपये प्रति किलो आहे. लासलगाव हे कांद्याचे सर्वात मोठे मार्केट आहे.(मुंबईत भाज्यांचे दर कडाडले, बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशी ही सुरु राहणार)

व्यापाऱ्यांच्या मते आताच्या कांद्याच्या किंमती यापूर्वी कधीच 200 रुपयांच्या वर गेल्या नाहीत. मात्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदुराई येथे सुद्धा 200 रुपये किलोने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. ग्राहक कांद्याचे दर वाढण्यापूर्वी एका वेळी 5 किलो कांदे खरेदी करायचे पण आता 1 किलोच कांद्याची खरेदी करतात. ग्राहकांचे असे म्हणणे आहे की, एका आठवड्यासाठी फक्त कांद्यासाठी 400-500 रुपये खर्च होत आहे.