Bridge | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाड येथील सावित्री नदी (Savitri River) पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जोरदार पावले टाकली जात आहेत. नाशिक (Nashik) शहरातील ऐतीसासिक असा अहिल्याबाई होळकर पूल (Ahilyabai Holkar Bridge) सेन्सर युक्त केला जात आहे. स्मार्ट सिटी (Smart City Nashik) मार्गदर्शनाखाली हे सेन्सर पुलाला लावले जात आहेत. हे सेन्सर पूलावरील कंपने, वजन आणि इतर काही धोक्याचे इशारे देणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे. या पूलाची ओळख एकेकाळी व्हिक्टोरिया पूल (Victoria Bridge) अशी होती. हा पूल 120 वर्षे जूना असल्याचे सांगितले जाते.

प्राप्त माहितीनुसार, स्मार्ट ब्रीज सर्व्हायलन्स सिस्टीम हा पायलट प्रोजेक्ट राबवताना स्मार्ट सिटी मार्गदर्शन लाभले. या सेन्सरमुळे नागरिकांना आणि प्रशासनाला पूलाबाबत धोक्याचा इशारा मिळणार आहे. पुलावरील वजन, कंपने, दाब आणि इतर काही धोकादायक गोष्टींची नोंद होणार आहे. तसेच काही धोका आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ संबंधित विभागाला मिळणार आहे. या माहितीमुळे संभाव्य धोका टाळण्यास मोठी मदत होईल, असे मानले जात आहे. (हेही वाचा, Photographs: मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना छायाचित्रे)

महाड येथील सावित्री पूल दूर्घटना ताजीच आहे. रात्रीच्या अंधारात महापुरामुळे पूल वाहून गेला आणि त्यात अनकांच बळी गेले. धोक्याची माहिती योग्य वेळी न मिळाल्यानेच हा प्रकार घडला. त्यामुळे राज्यातील पूलांचे ऑडीट करण्यात यावे अशीही मागणी झाली. तसेच, अशा पुलांबाबत काही अत्याधुनिक यंत्रणा बसवता येऊ शकते का याबाबत विचार सुरु होता. दरमयान, अरविंद जाधव हे या संकल्पनेवर काम करीत होते. त्यांनी हा पायलट प्रोजेक्ट मार्गी लावला.