COVID-19 रुग्णांचे वाढते आकडे पाहता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या 11 इमारती बनणार क्वारंटाईन सेंटर- BMC
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबईत कोविड 19 (COVID19) रुग्णांचे वाढते आकडे पाहता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (Slum Rehabilation Authority) (SRA) 11 इमारती या क्वारंटाईन सेंटर (qurantine Center) उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताब्यात दिल्या आहेत, याबाबत मुंबई महापालिकेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. या सर्व 11 इमारतींमधील मिळून तब्बल 2080 खोल्या आहेत. ज्यांचा कोरोना संशियत रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी उपयोग होणार आहे. एसआरएने आतापर्यंत विविध उपनगरी भागात 11 नवीन इमारती महापालिकेच्या स्वाधीन केल्या आहेत. तसेच कोरोना व्हायरसच्या संकटकाळात गरज भासल्यास अशा प्रकारच्या आणखी इमारती देखील उपलब्ध करुन दिल्या जातील असा विश्वास सुद्धा एसआरए ने व्यक्त केला आहे.

Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद

प्राप्त माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या पश्चिम आणि पूर्व दोन्ही प्रभागांमध्ये या इमारती विभागलेल्या आहेत. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी सांगितले की, या इमारती महापालिकेच्या स्वाधीन करण्यासाठी विविध विकासकांच्या सहकार्याने गेल्या २० दिवसांपासून काम सुरु होते, त्यानुसार योग्य प्लॅनिंग करून मगच या इमारती सोपवण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी नागरी शरीराला एक हजार खाटांचे COVID-19 रुग्णालय सुपूर्द केले.

दरम्यान मुंबई महापालिका वरळी येथील एनएससीआय, गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र, महालक्ष्मी रेस कोर्स आणि इतर काही ठिकाणी कोविड केअर केंद्र सुरू करण्याच्या विचारात आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे किती कोरोना रुग्ण; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही महाराष्ट्राच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक आहे. मुंबईतील अनेक भाग हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत, सद्य घडीलामुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 21 हजार 335 इतकी आहे. आजवर 3730 जणांनी कोरोनावर सफल मात केली आहे तर 757 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.दुसरीकडे, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 58 इतकी झाली आहे.