Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद
Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊन (Lockdown) चार बाबात नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात यापुढे केवळ 1) कंटेनमेंट झोन, 2) रेड झोन, 3) नाँन रेड झोन असणार आहेत. या नव्या नियमावलीनुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन असणार आहेत. तर रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतूक करता यणार आहे. दुसऱ्या बाजूला रात्री 7 ते सकाळी 7 या काळात कर्फ्यू असणार आहे.

Lockdown 4.0 महाराष्ट्रात काय सुरु? काय बंद?

काय सुरु/काय बंद रेड झोन (Red Zone) Remaining Area कंटेन्मेंट झोन
विमान, ट्रेन, मेट्रो नाही नाही नाही
राज्यांतर्गत वाहतूक नाही नाही नाही
शैक्षणिक संस्था नाही नाही नाही
हॉटेल्स नाही नाही नाही
शॉपींग मॉल्स नाही नाही नाही
धार्मिक स्थळं, केंद्र, हॉल नाही नाही नाही
मद्यविक्री दुकानं होय/ होम डिलीव्हरी होय नाही
गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक(65), 10 वर्षाखालील मुलांना बाहेर पडण्यास परवानगी नाही नाही नाही
मेडीकल क्लिनिक, ओपीडी होय होय नाही
टॅक्सी, कॅब, रिक्षा नाही 1+2 नाही
चार चाकी वाहन महत्त्वाचे असल्यास 1+2 नाही
दुचाकी महत्त्वाचे असल्यास 1 नाही
जिल्हांतर्गत वाहतूक नाही नाही नाही
जिल्हांतर्गत वाहतूक नाही होय नाही
मालवाहतूक होय होय होय
उद्योगधंदे (शहर) महत्त्वाचे असल्यास होय नाही
उद्योगधंदे (ग्रामिण) N/A होय नाही
ग्रामीण भागात बांधकाम साईट्स होय होय नाही
इतर खासगी बांधकाम साइट्स नाही होय नाही
Standalone Shop (शहर) Ltd. होय नाही
महत्त्वाची वस्तू विक्री दुकानं होय होय होय
 Essential Goods Shop होय होय होय
E-com Essential Goods होय होय नाही
E-com Non Essential Goods होय होय नाही
खासगी कार्यालयं नाही होय नाही
सरकारी कार्यालयं 5% ते 10% कमाल/किमान होय 100% नाही
शेतीविषयक व्यवहार/कामे नाही होय नाही
बँक/गुंतवणूक (फायनान्स) होय होय नाही
कुरीअर/ पोस्ट होय होय नाही
वैद्यकीय अत्यावश्यकता होय होय होय
केशकर्तनालय, स्पा, सलून नाही नाही नाही
स्टेडीयम (प्रेक्षकांविना) नाही होय नाही
घरपोच सेवा रेस्टॉरन्स्ट होय होय नाही
रजिस्टार, आरटीओ, होय होय नाही

ट्विट

(हेही वाचा,Coronavirus Outbreak: भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात सह अन्य राज्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स )

दरम्यान, दहा वर्षाखालील मुलं, गर्भवती महिला, ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिक यांना वैद्यकीय कारण वगळता इतर कारणांसाठी बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अधिक कठोर पावले उचलताना दिसत आहे.