Coronavirus In India | Photo Credits: Pixabay.com

भारतात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून देशात कोविड-19 (COVID-19) रुग्णांची संख्या 1 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत भारतात (India)4970 रुग्ण आढळले असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,01,139 वर पोहोचली आहे. देशात सद्य स्थितीत मृतांची एकूण संख्या 3163 वर पोहोचली असून 58,802 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 39,174 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र (Maharashtra) आढळले असून सद्य स्थितीत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 58 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 249 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार 437 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्र पाठोपाठ तमिळनाडू (Tamil Nadu)मध्ये 11,760 कोविड रुग्ण आहेत. तर गुजरात (Gujrat) मध्ये 11,745 कोरोनाचे रुग्ण आहेत. Coronavirus Update: महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे किती कोरोना रुग्ण; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

पाहूया देशात कोणत्या राज्यात आहे किती COVID-19 चे रुग्ण:

S. No. Name of State / UT Total Confirmed cases* Cured/Discharged/Migrated Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 2474 1552 50
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 107 41 2
5 Bihar 1391 494 9
6 Chandigarh 196 54 3
7 Chhattisgarh 93 59 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 10054 4485 168
10 Goa 38 7 0
11 Gujarat 11745 4804 694
12 Haryana 928 598 14
13 Himachal Pradesh 90 44 3
14 Jammu and Kashmir 1289 609 15
15 Jharkhand 223 113 3
16 Karnataka 1246 530 37
17 Kerala 630 497 4
18 Ladakh 43 41 0
19 Madhya Pradesh 5236 2435 252
20 Maharashtra 35058 8437 1249
21 Manipur 7 2 0
22 Meghalaya 13 11 1
23 Mizoram 1 1 0
24 Odisha 876 220 4
25 Puducherry 18 9 1
26 Punjab 1980 1547 37
27 Rajasthan 5507 3218 138
28 Tamil Nadu 11760 4406 81
29 Telengana 1597 1000 35
30 Tripura 167 85 0
31 Uttarakhand 93 52 1
32 Uttar Pradesh 4605 2783 118
33 West Bengal 2825 1006 244
Cases being reassigned to states 814
Total number of confirmed cases in India 101139# 39174 3163
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

मार्च महिन्यात सुरु झालेला लॉकडाऊन आता सुरु असलेल्या मे महिना अखेरपर्यंत कायम राहिल असे सांगण्यात आले आहे. हा लॉकडाऊन यापूर्वी 3 वेळा वाढविण्यात आला. सध्या लॉकडाउन 4.0 सुरु आहेत. दरम्यान, लॉकडाउन 4.0 मध्ये उद्योग, व्यवसाय आणि दुकाने सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काहीशी शिथीलता दिली आहे. मात्र, हे उद्योग सुरु करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) काही मार्गदर्शक तत्वं घालून दिली आहेत.