Supriya Sule And Sunetra Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Supriya Sule On BJP: सध्या सर्वचं पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत रोमांचक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गटाने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वहिनी सुनेत्रा पवार यांच्याशी कोणताही वाद नाही. वहिनी माझ्या आईसारखी आहे, हा दोन कुटुंबातील लढा नसून विचारधारेचा लढा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, भाजपची जाचक आणि चुकीची धोरणे, भ्रष्टाचार, वाढती महागाई, बेरोजगारी यांच्या विरोधात हा लढा आहे. इलेक्टोरल बाँड्स हा मोठा घोटाळा आहे. बारामतीचा पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा मुख्य मुद्दा आहे जो मी मांडणार आहे. (हेही वाचा -Uddhav Thackeray On INDIA Bloc Rally: 'अब की बार भाजपा तडीपार', उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथून नारा; Loktantra Bachao रॅलीत घणाघात)

भाजपने पवार कुटुंबात फूट पाडली - सुप्रिया सुळे

भाजप नेते बारामतीत येऊन मतदारांना शरद पवारांचा पराभव करायला सांगतात, पण विकासाच्या मुद्द्यावर मते मागत नाहीत. भाजपने पवार कुटुंबात फूट पाडली आणि आता त्यांना माझ्याविरोधात सुनेत्रा पवारांची गरज आहे, हे किती विडंबन आहे. हे खरंच खूप दुःखद आहे. (Lok Sabha Election 2024 : माजी आमदार दिलीप माने यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी; नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश)

वहिनी ही आईसारखी असते - सुप्रिया सुळे

वहिनी माझ्या आईसारख्या आहेत. कारण मी अशा संस्कारांमध्ये वाढले आहे. हा लढा कोणा एका व्यक्तीविरुद्ध नसून विचारधारेविरुद्ध आहे, असे मी वारंवार सांगितले आहे. आपण कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीत. ही निवडणूक कुटुंब किंवा मित्रांमधील भांडण म्हणून नव्हे तर आव्हान म्हणून घेतली आहे.