Lok Sabha Election 2024 : माजी आमदार दिलीप माने यांची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी; नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश
Photo Credit - Facebook

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आपला उमेदवार जिंकावा यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. दिलीप माने (Dilip Mane)यांच्या काँग्रेस (Congress) प्रवेशाने प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना फायदा होणार असल्याची शक्यता काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा :Lok Sabha Elections 2024 : भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शाह गडकरींसह फडणवीस, तावडेही करणार प्रचार )

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार दिलीप माने हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतल्या टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. आज दुपारी एक वाजता त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दिलीप माने हे जवळपास 25 वर्ष काँग्रेसमध्येच होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर ते राजकारणात कुठल्याही पक्षात सक्रिय नव्हते. (हेही वाचा :Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर )

काँग्रेसचे निष्ठावंत आमदार म्हणून दिलीप माने यांची या आधी ओळख होती. मात्र 2019 साली दिलीप माने यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये पुन्हा परतत आहेत.