Dhananjay Munde Allegation Case Updates: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोप प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत त्या महिलेविरोधात एका भाजप (BJP) नेत्याने पोलिसांत धाव घेतली आहे. कृष्णा हेगडे (Krishna Hegde) असे या भाजप नेत्याचे नाव आहे. कृष्णा हेगडे यांनी संबंधित महिलेविरोधात अंबोली पोलीस स्टेशन (Amboli Police Station) मध्ये तक्रार दिली आहे.
भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचा आणि माझा संबंध नाही. परंतू, मुंडे यांच्यावर जी महिला आरोप करत आहे तीने मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. ही महिला माझ्याशी संबंध ठेवा म्हणून मला मोबाईलवर मेसेज करत होती. मी तिला प्रतिसाद देत नव्हतो परंतू वारंवार ती माझ्याशी संपर्क करत होती. संबंधित महिला इतरही अनेकांना ब्लॅकमेल करत असल्याचे आपल्याला समजले आहे, असे हेगडे यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरूप गंभीर, पक्षातील इतर नेत्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार: शरद पवार)
दरम्यान, संबंधित महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार आपण आताच का देत आहात असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता कृष्णा हेगडे यांनी म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला कोणी टार्गेट करत असेल तर आपण त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. आज धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. उद्या आणखी कोणाला टार्गेट केले जाईल. मी जर या महिलेच्या संपर्कात आलो असतो तर काही वर्षांनी मलाही टार्गेट केले गेले असते. त्यामुळे एक नागरिक म्हणून असे करणे मला महत्त्वाचे वाटते असे कृष्णा हेगडे यांनी म्हटले. (Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणी जंयत पाटील, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या प्रतिक्रिया)
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला 2010 पासून आपल्याशी संपर्क साधण्याचा आणि संबंध ठेवण्याबाबत आग्रह धरत होती. तिने आपल्याला शेवटचा मेसेज 7 आणि 8 जानेवारीला केला होता. या महिलेला आपण काही काळासाठी एका कार्यक्रमात 4 ते 5 वर्षांपूर्वी भेटलो होतो, असेही कृष्णा हेगडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात असल्याचेही मत कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कृष्णा हेगडे हे भाजपचे नेते आहेत. हेगडे यांच्या माहितीमुळे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणाला वेगळेच वळण मिळू शकते. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष मात्र जोरदार आक्रमक झाला आहे. भाजप नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. परंतू, कृष्णा हेगडे यांच्या नव्या माहितीमुळे कहाणीत ट्विट्स आला आहे. आता हे प्रकरण काय वळण घेते याबाबत उत्सुकता आहे.