केवळ 30 हजार रुपयांसाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सांगली (Sangali) येथील जत (Jath) तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीला कोल्हापूर (Kolhapur) येथून अटक केली आहे. मृत महिलेच्या विवाहित मुलीनेच याघटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे. रात्री घरी आल्यानंतर आरोपीने मद्यधुंद अवस्थेत महिलेकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. परंतु, महिलेने साफ नकार दिल्यानंतर आरोपी संतापला. त्यावेळी आरोपीने दारुच्या नशेत धारदार शस्त्राने महिलेचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मंजुळा जाधव (45) असे मृत महिलेचे नाव आहे, तर श्रीकांत राजाराम जाधव असे आरोपीचे नाव आहे. मुंजळा ही आरोपीची आई असून गुरुवारी रात्री श्रीकांतने तिच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी श्रीकांत हा मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे मंजुळाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. दरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. यातून श्रीकांत याने धारदार शस्त्राने मुंजळा हिच्यावर हल्ला केला. यामुळे मंजुळा हिला आपला जीव गमवावा लागला. हे देखील वाचा-मुंबई: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये बॅगेत सापडले महिला मृतदेहाचे तुकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या विवावित मुलगी स्वाती गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करुन घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर आईची हत्या करुन पळ काढणाऱ्या श्रीकांतला पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली.