मुंबई: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये बॅगेत सापडले महिला मृतदेहाचे तुकडे
Representational Image (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी माहिमजवळ सुटकेसमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे बॅगेमध्ये आढळल्यानंतर आता कल्याण स्थानकामध्येही एका सुटकेसमध्ये स्त्री मानवी शरीराचे तुकडे सापडले आहे. ही सुटकेस ठेवणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली असून त्यावरून पोलिस अधिक तपास करत आहे. कल्याणजवळ सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचा कंबरेपासून खालचा भाग मिळाला आहे. धड आणि शीर गायब असून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे माहिमजवळ सूटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहची ओळख पटकून या प्रकरणाचा छडा लवण्यास पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान कल्याण स्थानकात सापडलेल्या मृतदेहाचा अधिक छडा लावण्यासाठी महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी काम करत आहेत. कल्याण सारख्या सतत वर्दळ असणार्‍या भागामध्ये अशाप्रकारे मृतदेहाची सूटकेस ठेवल्याचं वृत्त समजताच खळबळ उडाली आहे. मुंबई: माहीमच्या समुद्रकिनारपट्टीवर बेवारस सुटकेसमध्ये सापडले पुरुषाच्या हातपायांचे तुकडे.

माहिम मर्डर मिस्ट्री उलगडली

माहिममध्ये सूटकेसमध्ये आढळलेला मृतदेह हा दत्तक घेतलेल्या मुलगी व तिच्या प्रियकराकडून करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. मुलीच्या प्रेमसंबंधांना वडिलांची मंजुरी नसल्याने त्यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे केले. हे 3 बॅंगांमध्ये भरून समुद्रामधेय फेकण्यात आले. नंतर ते वाहत माहिमच्या किनारी वाहत आले. एका सूटकेसमध्ये असलेल्या मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या टेलरच्या स्टॅम्पच्या मदतीनेही मर्डर मिस्ट्री उलगडण्यास मदत झाली. दरम्यान वडिलांची संपत्ती मिळवण्यासाठी आणि लग्नाला असलेल्या विरोधाच्या रोषातून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.