मुंबई: माहीमच्या समुद्रकिनारपट्टीवर बेवारस सुटकेसमध्ये सापडले पुरुषाच्या हातपायांचे तुकडे
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

माहीमच्या समुद्र किनारपट्टीवर (Mahim Sea) एका बेवारस सुटकेसमध्ये पुरुषाच्या हातपायांचे तुकडे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. माहीम दर्ग्याच्या पाठिमागच्या बाजूला काही तरुणांना ही सुटकेस दिसली. सुटकेस जड लागल्यामुळे त्या तरुणांनी ती उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना त्या सुटकेसमध्ये पुरुषाचे तुटलेले हातपाय आढळले. त्यानंतर तरुणांनी लगेच स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेवून सुटकेत ताब्यात घेतली आहे. तसेच याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर सापलेली सुटकेस ही काळ्या रंगाची असून अमेरिकन टुरिस्टर कंपनीची आहे. सोमवारी काही तरुणांना ही सुटकेस पाण्यावर तरंगत असताना दिसली. त्यानंतर त्यांनी सुटकेस उघडून पाहिले तर, त्यात एका मानवी शरिराचे काही अवयव सापडले. सुटकेसमधील तुकडे पाहून संबधित तरुण घाबरले आणि त्यांनी लगेच स्थानिक पोलिस ठाण्यात संपर्क साधला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुटकेस ताब्यात घेतली. सुटकेसमधील तुकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर चौकशीतून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा-ठाणे: कळवा पुलावर 40 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी वाचवले 'हायड्रा'च्या मदतीने प्राण (Watch Video)

दरम्यान, सुटकेसमध्ये मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात व गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय सापडले तर, प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत पुरुषाचे कापलेले गुप्तांग आढळून आले आहे. शीर आणि धड काहीच नसल्याने हे हात आणि पाय कुणाचे आहेत हे कळू शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.