पुणे- शिवशाही बस शिंदेवाडी घाटात दरीत कोसळली; अपघातात 2 ठार तर 24 प्रवाशी गंभीर जखमी
Shivshahi Bus Accident (PC - ANI)

अलिकडे शिवशाही बसच्या अपघाताचे (Bus Accident) प्रमाण वाढले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्वारगेट ते सांगली प्रवाशी घेऊन निघालेली शिवशाही बस कात्रज घाटात शिंदेवाडी गावच्या (Shindewadi village) हद्दीत सुमारे पंचवीस फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 24 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघात झालेली बस स्वारगेट स्थानकावरून दुपारी 1 च्या सुमारास सांगलीला निघाली होती. या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी होते. ही बस शिंदेवाडी घाटाजवळ आली असता बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार झाला असून सुमारे 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप मृत प्रवाशाचे नाव समजू शकलेले नाही. (हेही वाचा - पुणे: दिवे घाटात वारकर्‍यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेव यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांंच्यासह एकाचा मृत्यू; 15 जखमी)

एएनआय ट्विट - 

या अपघातात बसचा चक्काचुर झाला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यात आले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.