Sharad Pawar यांच्याकडून Raj Thackeray च्या टीकेला प्रत्युत्तर; 'बालिश' भाषण म्हणत ठाकरेंना पहा काय सुनावले?
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

मनसेच्या गडकरी रंगायतन जवळ झालेल्या कालच्या उत्तरसभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर एनसीपीचे नेते होते. आज राज ठाकरेंचा समाचार शरद पवार यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे. दरम्यान राज ठाकरे 5-6 महिन्यांत एकदा बोलतात त्यांच्याकडे लक्ष देण्याचं गरज नाही असं म्हटलं आहे. पण त्यांनी 3-4 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केल्याने त्याचं स्पष्टीकरण देत असल्याचं सांगत त्यांनी कॉंग्रेस-एनसीपीची युती ते जातीयवादाच्या मुद्द्यावरून केलेया टीकेला उत्तर दिलं आहे. हे देखील वाचा: Raj Thackeray यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल; उत्तरसभेत तलवार दाखवल्यामुळे Arms Act अंतर्गत कारवाई .

एनसीपीचे नेतृत्त्व विविध समाजातील नेत्यांनी केले आहे. त्यामुळे जातीयवादाचा आरोप त्यांनी खोडून काढला आहे. तर आस्तिक की नास्तिक आहे यावर बोलताना आपण प्रचाराचा नारळ बारामतीमध्ये एकाच देवळात करतो पण त्याचा गाजावाजा करत नाही असं म्हटलं आहे. पण काही आदर्श आहे त्यामध्ये प्रबोधन ठाकरेंचं लेखन प्रभावित करतं. राज ठाकरेंनी ते वाचावं असा सल्ला त्यांना दिला आहे. सोबतच महाराष्ट्राला फुले, आंबेडकरांचा वारसा आहे याचा मला अभिमान आहे आणि तो शिवरायांचाच विचार आहे. दरम्यान आपण पुरंदरेंच्या लेखणाच्या विरोधात असण्यावर ठाम असल्याचाही पुनरूच्चार केला आहे.

शिवरायांवर जिजाऊ यांचे संस्कार आहेत पुरंदरेंच्या लिखाणात त्यांच्यावर दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना घडवलं असं म्हटलं आहे. त्यामुळे पुरेंदरांवर टीका करणार्‍यांचा मला अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं आहे. NCP Rally Kolhapur: 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा' ची सांगता कोल्हापूरात 23 एप्रिलला; 'करारा जबाब मिलेगा' म्हणत जारी केला नवा व्हिडिओ  .

राज ठाकरेंनी काल पुन्हा अजान आणि भोंगा वरून राज्य सरकारला 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिलं आहे. पण हा प्रकार राज्यात शांततेचा भंग करणारा आहे असे म्हणत राज ठाकरेंचं कालचं भाषण बालिश असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे स्वतःला राजकीय नेते म्हणतात मग जनतेच्या प्रश्नाला का संबोधलं नाही? महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर यावर काहीच का बोलले नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर झालेल्या  हल्ल्याप्रकरणी बोलताना त्यांनी,' मी त्यांना  दोष देणार नाही. ते कामगार आहेत. त्यांच्या मागण्या असतील. त्या मागण्यांसाठी ते आंदोलनाला बसले. त्यांना चुकीचं नेतृत्व मिळालं.  राज्य सरकार, एसटी महामंडळ त्याचा निर्णय घेतील पण त्यांचा उल्लेख न करता माझं नाव घेऊन टीका-टिप्पणी करून कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मनात काहीतरी भरवलं गेलं. त्याचा हा परिणाम आहे. त्यांना दोष न देता त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या घटकांवर कारवाई व्हायला हवी.'  असे ते म्हणाले.

दरम्यान राज ठाकरेंनी काल ठाण्यातील उत्तरसभेत अझान आणि भोंगा वादावरून एनसीपीच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा समाचार घेतला होता. यावेळी काहींच्या नकलादेखील करत त्यांनी शरद पवार राजकीय भूमिका बदलतात आणि राज्यात वाढलेल्या जातीयवादाला एनसीपी जबाबदार असल्याचा पुनरूच्चार केला होता.