Sharad Pawar दिल्ली दौर्‍यावर; डिफेन्स कमिटीच्या बैठकीला हजर राहण्याची, Rajnath Singh यांच्या भेटीची शक्यता- सूत्र
NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज दिल्ली दौर्‍यावर जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. आज पवारांनी सारे नियोजित कार्यक्रम रद्द करत दिल्ली गाठणार असल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात देखील चर्चांना उधाण आले आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास शरद पवार दिलीमध्ये होणार्‍या डिफेंस कमिटीच्या बैठकीला (Defence Committee Meeting) उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. यावेळी ते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील सध्या दिल्लीत असल्याने भाजपा नेत्यांसोबतच्या पवारांच्या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा होणार? काय चर्चा होणार? याचीही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरद पवार आणि एनसीपी नेते प्रफुल पटेल दिल्लीमध्ये पोहचले आहेत. शरद पवार माजी केंद्रीय संरक्षण मंत्री होते. सध्या ते डिफेंस कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळेच सध्या ते दिल्लीला गेले आहेत. या डिफेन्स कमिटीच्या बैठकीनंतर दिल्लीत शरद पवार आणि राजनाथ सिंह यांची भेट होऊ शकते. Eknath Khadse यांनी मुंबई मध्ये घेतली Sharad Pawar यांची भेट; जळगाव च्या विकासासाठी जिल्ह्याला ताकद देण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा .

दिल्ली मध्ये सध्या महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस देखील आहे. दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत त्यांची खलबतं सुरू आहेत. त्यांची भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्रि अमित शाह यांच्यासोबत भेट झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात आता हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप आणि त्यावरील भूमिका यावरून राज्य सरकार आणि भाजपा असा संघर्ष पहायला मिळाला आहे. या सार्‍याची दिल्लीत काय चर्चा होते याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.