एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासाबाबत व पावसाच्या वादळीवाऱ्याने ,अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. जळगाव जिल्हा विकासापासून कसा वंचित राहिला आहे हे पवारांना समजावून सांगितले.सध्या जळगाव जिल्ह्याला कोणी वाली नाही, जिल्ह्यात निधी नाही ,कुठला मोठा प्रकल्प जिल्ह्यात नाही, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध नाही केंद्र सरकारचा कुठलाही निधी अद्याप पर्यंत जिल्ह्याला मिळाला नाही आपण जळगाव जिल्ह्याकडे लक्ष घातले पाहिजे .आमच्या जिल्ह्याला ताकद द्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे तसेच जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या. अशी खडसेंनी मागणी केली आहे.
'आगामी निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेआमदार निवडून येतील सध्या जनतेचा कौल जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे व त्यासाठी कार्यकर्ते सुद्धा आगामी निवडणुकीसाठी सज्ज आहोत. मागील पाच वर्षात भाजपाने जळगाव जिल्ह्याचे वाटोळे केले व्यक्ती दोषी राजकारण करून माझ्यासह जळगाव जिल्ह्याच्या सर्व जनतेला भाजपने वेठीस धरले आणि एक रुपयाही निधी जिल्ह्याला दिला नाही किंवा कुठले मोठे प्रकल्प दिले नाही' असे यावेळी एकनाथराव खडसे यांनी शरद पवार साहेबांना सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकार मध्ये जिल्ह्याला निधी दिला पाहिजे सामान्य कार्यकर्त्यांचे काम सरकारमध्ये झाले पाहिजे. आपल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचे कामे करण्याबाबत तंबी दिली पाहिजे. त्यामुळे पक्षसंघटना मध्येही याचा बराच फायदा होईल अशा विषयांमध्ये एकनाथ खडसे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आहे.
'अनेक वर्ष विधानसभेत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या लोकांच्या हितासाठी वेळो-वेळी आपले उपद्रव मूल्य एकनाथराव खडसे यांनी दाखवून दिले आहे. मागील फडणवीस सरकार पासून यांना थांबवण्याचे काम करण्यात आले आहे. नुसते नाथाभाऊ यांनाच थांबवले नाही तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाला सुद्धा थांबवले गेले हे पाप भाजपने केले भारतीय जनता पार्टी नुसतं नाथाभाऊ खडसे यांचा विरोध करत नसून संपूर्ण जिल्ह्याला विरोध करत आहे. हे यातून स्पष्ट दिसते यामुळेच जळगाव जिल्ह्याच्या जनतेमध्ये खूप मोठा भाजप विरोधी असंतोष पसरला आहे आणि हा असंतोष मतपेटी मधून जनता भाजपाला दाखवणारच आहे यात काही शंका नाही.' असे प्रतिपादन माळी समाज महामंडळाचे अध्यक्ष ओबीसी नेते व एकनाथराव खडसे यांचे समर्थक अनिल भाऊ महाजन यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले.