Image only representative purpose (Photo credit: pxhere)

मुंबई मध्ये मानखुर्द गोवंडी परिसरात सजग समाजसेविकेमुळे एक सेक्स रॅकेट (Sex Racket)  उघडकीस आणण्यास मदत झाली आहे. दरम्यान यासोबतच एका मुलीला वेश्या व्यवसायामध्ये (Prostitution) ढकलण्याचा त्यांचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. 13 वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायात टाकनार्‍या 4 जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी जेरबंद केलं आहेत. असे वृत्त TOI ने दिले आहे.

वेश्याव्यवसायाचं हे रॅकेट 3 पुरूष आणि एक महिला यांच्या माध्यमातून चालवलं जात होते. अस्मा लोखंडवाला या समाजसेविकेच्या टीप वरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नेहरू नगर पोलिस स्टेशन द्वारा कारवाई करताना 4 जणांना अटक करण्यासोबत 26 वर्षीय एक तरूण ग्राहक देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 जणांना अटक करत 8 मॉडेल्सची पोलिसांनी केली सुटका.

सध्या अल्पवयीन मुलीवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून चारही गुन्हेगारांवर विविध आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये PITA आणि POCSO अ‍ॅक्टचा देखील समावेश आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अत्यंत गरीब घरातील असून झोपडावस्तीमध्ये तिचं घरं आहे. दरम्यान चारही आरोपींना कोर्टात दाखल केले असून त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.