मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 जणांना अटक करत 8 मॉडेल्सची पोलिसांनी केली सुटका
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतून (Mumbai) एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पोलिसांनी पर्दाफाश केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील आलिशान हॉटेलमधील हा प्रकार असून येथून 8 मॉडेल्सची सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलवर ही धाड टाकण्यात आली आहे.(Bollywood and TV Actresses Arrested in Sex Racket: मुंबई मधील सेक्स रॅकेट उघडकीस; बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींना अटक)

TOI यांनी दिलेल्या माहितीनुसार,   पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुहू येथील एका हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी तेथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर आठ तरुणींची तेथून सुटका केली गेली आहे. या तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याचे ही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून देहविक्रीसाठी सु्द्धा तरुणांना भाग पाडल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.(मुंबई: कांदिवली येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह 4 तरुणींची सुटका)

याआधी कल्याण  पूर्वेतील नांदीवली परीसरात एका इमारतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत एका तरुणासह 4 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती.  नांदीवलीतील एका इमारतीत देहविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या इमारतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.