मुंबई: कांदिवली येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह 4 तरुणींची सुटका
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेटच्या (Sex Racket) अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री कांदिवली (Kandivali) येथील स्टारबक्स कॅफेमध्ये बॉलिवूड आणि मालिका संबंधित अभिनेत्रींसह 4 तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात 2 महिलेचा समावेश असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का लागला आहे. कांदिवली पश्चिम येथील महावीरनगर परिसरातील स्टारबॅक्स कॅफेमध्ये सेक्स रॅकेट संबंधित व्यवहार होत असल्याची माहिती मुंबईच्या एसएस शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामुळे आजूबाजुच्या परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.

मुंबई पोलिसांना गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा गळा आवळण्यात यश आले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूडशी संबंधित असलेल्या अनेक अभिनेत्रींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला आहे. यातच कांदिवली येथील नव्या बातमीने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अदित्य, प्रियंका आणि प्रमिला या आरोपींना अटक केली आहे. प्रियंका ही प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते तर, प्रमिला ही सेक्स रॅकेटसाटई मुली सप्लाई करत असल्याची माहिती मिळाली आहे. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एकीने सिनेमात काम केले असून दोघीजण कलर्स वाहिनी कार्यक्रमात अभिनेत्री म्हणून काम करत आहेत. तसेच एक तरुणी अप्लवयीन आहे, अशी माहिती एका वृत्त वाहिनीने दिली आहे. हे देखील वाचा-कंडोम घालायला सांगितला म्हणून ग्राहकाकडून वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून

मुंबई येथील कांदिवली पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून कांदिवली पोलीस या प्रकरणांमध्ये अधिक तपास करीत आहेत. याआधी जेवढी बॉलिवूड संबंधित सेक्स रॅकेट उघड झाली आहेत, त्याचे आणि याचे काही आपसात संबंध तर नाही ना? या अनुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत.