सुरक्षित शरीरसंबंधांचा (Safe Sex) आग्रह धरला म्हणून ग्राहकाकडून वेश्या व्यवसाय (Sex Worker) करणाऱ्या महिलेची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बंगळरू (Bengaluru) येथील राजाजीनगर (Rajaji Nagar) परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. सुरक्षित शरीरसंबंधांसाठी संबंधित महिलेने ग्राहकाला कंडोम घालायला सांगितला. पण ग्राहकाने नकार दिला तसेच त्याने आपले पैसे परत मागितले. तिने पैसे परत करण्यास नकार दिला. यावादातूनच या महिलेचे हत्या झाल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडीयाने दिली आहे.
आरोपी एका खासगी कंपनीत कामाला असून बुधवारी त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीची बुधवारीच मृत महिलेशी भेट झाली होती. त्यावेळी शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिने ग्राहकाकडे 2 हजार 500 रपयांची मागणी केली. अखेर 1 हजार 500 रुपयांत त्यांच्यात व्यवहार ठरला. अॅडव्हान्स म्हणून तिने 500 रुपये घेतले. त्यानंतर या महिलेने आरोपीला दुपारी १ वाजताच्या सुमारास आपल्या घरी घेऊन गेली. दरम्यान, महिलेने सुरक्षित शरिरसंबंधासाठी तिने ग्राहकाला कंडोम घालण्याचा आग्रह केला. मात्र, याला आरोपीने नकार देत आपले पैसे परत मागितले. परंतु, महिलेने पैसे परत देण्यास नकार दिला. सुरक्षिततेशिवाय शरीरसंबंध ठेवल्यास आरडाओरडा करीन अशी तिने धमकीही महिलेने आरोपीला दिली. या वादातून आरोपी ग्राहकाने त्याच्या बॅगेतून चाकू काढून तिचा गळा चिरला. हे देखील वाचा- ठाणे: गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने दिली 450 उठाबश्या काढण्याची शिक्षा, गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही पतीपासून विभक्त झाली आहे. पैशांच्या वादातून संबंधित महिलेची हत्याची कबूली आरोपीने दिली आहे. महिलेचा मुलगा शाळेतून पावणेचारच्या सुमारास घरी आल्यानंतर या महिलेची हत्या झाल्याचे समजले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीला शोधून काढले व त्याला अटक केली.