Bollywood and TV Actresses Arrested in Sex Racket: मुंबई मधील सेक्स रॅकेट उघडकीस; बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई (Mumbai) मधील पंचतारिक हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट (Sex Racket) मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. यात बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही (TV) अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. गोरेगांव (Goregaon) येथील पंचतारिक हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी 3 अभिनेत्रींवर भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज18 ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाला सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. त्याच आधारे त्यांनी संबंधित पंचतारिक हॉटेलवर धाड टाकली. आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. ग्राहक बनून पोलिस सेक्स रॅकेटच्या डिलर्सला भेटले आणि 3 अभिनेत्रींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या 3 अभिनेत्रींपैकी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे आणि इतर दोघी टीव्ही अभिनेत्री आहेत. विशेष म्हणजे संबंधित बॉलिवूड अभिनेत्री मनोरंजन विश्वातील अनेक मुलींना देह व्यापारासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये घेऊन येते, असा तिच्यावर आरोप आहे. (मुंबई: गोरेगाव परिसरातील एका हॉटेलमधील SEX रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह एक मॉडेल अटकेत)

रिपोर्टनुसार, ही बॉलिवूड अभिनेत्री आंतरराष्ट्रीय बेली डान्सर आहे. देहव्यापारासाठी तिच्यात आणि इतर दोन अभिनेत्रींमध्ये 10 लाखांचे डिल करण्यात झाले होते. दरम्यान, पोलिसांनी वेळीच कारवाई करुन आरोपींना अटक केली. (मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून Sex Racket चा पर्दाफाश; 3 जणांना अटक तर दोन तरूणींची सुटका)

यापूर्वीही मनोरंजन विश्वातील अनेक महिला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वेबसाईटच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यातून 4 मुलींची सुटका करण्यात आली होती. लॉकडाऊनपूर्वी देशातील विविध भागातून या मुलींना आणण्यात आले असून हे काम करण्यास त्यांच्यावर जबसदस्ती केली जात होती. सुगावा लागताच मुंबई पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना अटक केली.