मुंबई: गोरेगाव परिसरातील एका हॉटेलमधील SEX रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह एक मॉडेल अटकेत
प्रतिकात्मक फोटो. (Photo Credit: PTI)

गोरेगाव (Goregaon) परिसरातील वेस्टीन हॉटेलमधील (Westin Hotel) सेक्स रॅकेटचा (Sex Racket) मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, अभिनेत्री अमृता धानोआ (Amrita Dhanao) आणि मॉडेल रिचा सिंह (Richa Singh) या दोघीही त्या ठिकाणी आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी या दोघींनाही अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  समता नगरचे वरिष्ठ निरीक्षक राजू बाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपआयुक्त डॉ. डी स्वामी यांच्या देखरेखीखाली शुक्रवारी मध्यरात्री 12. 15 मिनिटाने छापा टाकण्यात आला, अशी माहिती मिड-डे ने दिली आहे.

मुंबई सारख्या शहरात सेक्स रॅकेटच्या अनेक घटना घडत असून याला आळा घालण्यासाठी मु्ंबई पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. यातच गोरेगाव परिसरातील वेस्टीन हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतरस त्यांच्याच गटातील एका पोलीस अधिकाऱ्याने ग्राहक म्हणून एका महिलेशी संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांनी अभिनेत्री अमृता धनोआ आणि मॉडेल राची सिंह हिला ग्राहकांकडून पैसे घेत असताना रंगे हाथ पकडले. त्यानंतर अमृता आणि राचीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमृता धनोआ ही बिग बॉस 13 ची स्पर्धक होती. याशिवाय अभिनेता अरहान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते, असेही बोलले जात आहे. हे देखील वाचा- डीआयजी निशिंकात मोरे यांची अटक अटळ; पनवेल कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला; पीडितेच्या कुटुंबाला धमकी देणारा दिनकर साळवे निलंबीत

एएनआयचे ट्वीट-

दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी सांगितले की, 32 वर्षीय अमृता धानोआ आणि 26 वर्षीय रिचा सिंग यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 370 (3), 34 आणि अनैतिक प्रतिबंधक कलम 4,5 अन्वये अटक करण्यात आली आहे.