मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून Sex Racket चा पर्दाफाश; 3 जणांना अटक तर दोन तरूणींची सुटका
Sex Racket | Photo Credits: PTI

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने शनिवारी (28 सप्टेंबर) एक सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. अंधेरीमध्ये एका हॉटेलमध्ये हा प्रकार होत असल्याचं उघड झालं आहे. यामध्ये मुंबई पोलिसांनी 3 लोकांना अटक केल्याची माहिती आहे. त्यानंतर दोन तरुणीची सुटका केली आहे. ही टोळी गेल्या अनेक दिवसांपासून देहविक्रीच्या कामामध्ये विदेशी तरुणांनींचाही यासाठी वापर केल्याचे उघड झाले आहे.

अंधेरीच्या जेबी नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये ऑनलाईन देहविक्रीचं काम सुरू असल्याची टीप मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर क्राईम ब्रांचने 10 जणांच्या टीमसोबत अंधेरीच्या बड्या हॉटेलवर छाप टाकली होती. करण नमन यादव हा या हॉटेलचा मालक असून त्याच्यासोबत संतोष यादव, अशोक यादव यांना अटक करण्यात आली आहे. तर समीर आणि अमर याद्व हे दोन संशयित आरोपी फरार आहेत. पुणे: स्पा मसाजच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, पोलिसांनी धाड टाकत 5 परदेशी तरुणींना घेतले ताब्यात.

पोलिसांनी अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत टाकण्यात आलं आहे. बोगस ग्राहक बनवून दलालांना अडकविण्याचा प्लॅन मुंबई पोलिसांनी आखला. त्यानुसार इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. सोशल मीडियावरून पाठविलेल्या तरुणींपैकी एकीला पसंत करण्यात आले.