पुणे (Pune) येथील कोरेगाव पार्क जवळ एका स्पा मसाजच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट (Sex Racket) सुरु होते. याबाबत पोलिसांना टीप मिळाली असता त्यांनी एका पोलिसाला बनावट ग्राहक बनवून त्या स्पा मध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मसाज पार्लरवर धाड टाकली. यामध्ये 5 परदेशी तरुणींसह स्पा मसाज पार्लरचा मालक याला सुद्धा ताब्यात घेतले आहे.
जीवांका स्पा असे मसाज पार्लरचे नाव असून गोपाळ मिश्रा हा त्याचा मालक आहे. अशोक मॉलमध्ये जीवांका स्पा सुरु होताच. पण स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय येथे सुरु करण्यात आला होता. यामध्ये ताब्यात घेतलेल्या 5 परदेशी तरुणी यांच्याकडे टुरिस्ट व्हिसा असून त्या भारतात आल्याचे समोर आले होते. तर या सेक्स रॅकेटमध्ये या पाच तरुणींचा सुद्धा सहभाग आहे.
या प्रकरणी कोरेगाव पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच पुण्यातील सहकार नगर येथे सुद्धा वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेथे ही पोलिसांनी धाड टाकत एका महिलेला अटक केली असून एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे.(पुणे येथे Massage Centre मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीला अटक)