sex racket | Representational Image | (Photo Credit: PTI)

Sex Racket Demolished In New Mumbai: नवी मुंबई पोलिसांच्या (New Mumbai Police) क्राइम ब्रँचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (Crime Branch's Anti-Human Trafficking Unit/AHTU) मोठी कारवाई करत बेलापूर (Belapur) मधील अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या सेक्स रँकेट (Sex Racket)चा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रँकेट चालवणाऱ्या 55 वर्षीय महिलेला अटक (Arrest) करण्यात आली आहे. तसेच देहव्यापारास (Prostitution) भाग पाडणाऱ्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. बेलापूर येथील एका अपार्टमेंटमधून ही महिला वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

प्राप्त माहितीनुसार, AHTU ला Smile Foundation या मुंबईस्थित NGO कडून बेलापूर येथील सेक्टर 1A मधील स्नेहालय अपार्टमेंटमधील बेकायदेशीर कामांबाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रारीनुसार, आरोपी महिलेने व्हॉट्सॲपद्वारे संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधला. तसेच मुलीचे फोटो शेअर केले आणि ग्राहकांना देहव्यापारासाठी अपार्टमेंटमध्ये आमंत्रित केले. कनंकम्मा असं या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला प्रत्येक ग्राहकाकडून 2,500 रुपये घेत असे. (हेही वाचा -Prostitution Racket At Spa in Vashi Mall: नवी मुंबई मध्ये स्पा सेंटर खाली वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणार्‍या महिलेला अटक)

या माहितीच्या आधारे एएचटीयू टीमने शुक्रवारी रात्री डमी ग्राहक पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. इमारतीच्या बाहेर आधीच तैनात असलेले पोलिस पथक अपार्टमेंटमध्ये घुसले आणि त्यांनी महिलेला पकडले. (हेही वाचा - Prostitution Racket Busted in Chennai: चेन्नईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 14 वर्षांच्या बहिणीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपी बहिणीसह 5 जणांना अटक)

पोलिसांना या अपार्टमेंटमध्ये कंडोमसह इतर वस्तू सापडल्या. पोलिसांनी देहव्यापारात भाग पाडलेल्या महिलेची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने कमाईतील बहुतांश भाग स्वत:कडे ठेवला आणि सुटका केलेल्या मुलीला थोडीशी रक्कम दिली. बेलापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.