इंदापूर मध्ये शालेय सहलीच्या बसला अपघात झाला आहे. शाळेच्या बसला टेम्पोची धडक बसली आहे. यामध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी होते. दरम्यान एका वळणावर टेम्पोने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शालेय सहलीमध्ये हा प्रकार घडला आहे. तर अपघात हा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) तालुक्यातील वटपळी (Vatpali) येथे झाला आहे.
दरम्यान अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना अकलूज मध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज पहाटे सोलापूर मध्ये अकलूज जवळ झाला आहे. कोकण दर्शनाला निघालेल्या बसचा हा अपघात झाला. आयशय टेम्पो मधून बांबूची वाहतूक केली जात होतो. टेम्पो पंक्चर झाला आणि एका अवघड वळणावर येऊन थांबला. त्यानंतर टेम्पोला बसची धडक बसली आणि हा अपघात झाला. सध्या या अपघात प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. School Bus Accident: धावत्या स्कूलबसमध्ये चालकाला फेपरे, मोठी दुर्घटना थोडक्यात वाचली, नाशिक जिल्ह्यातील घटना .
शाळेच्या बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी प्रवास करत होते. रात्री ही बस गणपतीपुळेला गेली होती. तेथून परतीच्या प्रवासादरम्यान बसला हा भीषण अपघात झाला आहे.