School Bus Accident in Nashik: स्कूलबस चालवताना चालकाला अचानक मिरगीचा झटका आला. त्यामुळे बसला अपघात घडला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी रस्त्यावर असलेल्या म्हसरुळ पोलीस स्टेशन समोरील परिसरातच ही घटना बुधवारी (21 जून) रोजी घडली. एका खासगी शाळेची बस (एमएच 15 जीएन 4291) दुपारी तीनच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. दरम्यान, बस चालकाला फेपरे (Epilepsy) मिरगीचा झटका (Epilepsy) आला. त्यामुळे त्याचे बसवरी नियंत्रण सुटले आणि बस रिक्षाला धडकली. वसचा वेग कमी असल्याने बस पतपथावर चढली आणि उभी राहीली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ज्यांनी हा थरारक प्रसंग पाहिला त्यांचा मात्र थरकाप झाल्यापासून राहिले नाही.
चालकाचे नियंत्रण सुटताच ही बस दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी बिल्डिंग नजीक असलेल्या पतपथावर चढली. या पदपथावर हार, भाजीपाला, फुले आणि इतर साहित्य विकणारे व्यावसायिक, पादचारी आणि इतरही नागरिक होते. मात्र, ते काहीसे दूर अंतरावर असल्याने त्यांना कोणताही धोका उत्पन्न झाला नाही. ही घटना घडली त्या वेळी बसमध्ये साधारण 20 ते 25 विद्यार्थी होते. बसचा अपघात झाल्याचे लक्षात येताच या सर्वांनी बसकडे धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना सुरक्षीतपणे बाहेर काढले. (हेही वाचा, Nanded News: धावत्या एसटी बसचा दरवाजा अचानक उघडला, प्रवाशाचा मृत्यू, कंधार तालुक्यातील शेल्लाळी येथे खराब रस्त्यामुळे एकाचा हाकनाक बळी)
नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थ्यांच्या आणि इतर कोणाच्याच जीविताला धोका निर्माण झाला नाही. मात्र, थोडी जरी आणखी चूक झाली असती तर विद्यार्थ्यांच्या प्राणावर बेतू शकले असते. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षीत खाली उतरवल्यानंतर त्यांना दुसऱ्या रिक्षांनी निश्चित ठिकाणी सोडण्यात आले. चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि बसही पादचारी मार्गावरुन पुन्हा रस्त्यावर घेण्यात आली. या घटनेत बसचे किरकोळ नुकसान झाले आहे.