Savitribai Phule Jayanti 2021| Photo Credits: File images

भारतामध्ये स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Jayanti) यांची आज 190 वी जयंती. या दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेत जनमाणसांत तो रूजवण्यासाठी आता राज्य सरकारने सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन (Mahila Shikshan Din)  म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. यंदाच्या वर्षी राज्यात पहिलाच महिला शिक्षण दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नेते बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर, धनंजय मुंडे, पूनम महाजन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली अर्पण करून त्यांना नमन करत पहिल्या महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Mahila Shikshan Din 2021: सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा होणार महिला शिक्षण दिन; जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातार्‍यामध्ये 1831 साली झाला होता. त्यांनी स्त्रीयांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्यासोबतच सतीला विरोध, विधवा पुनर्विवाह अशा पुरोगामी विचारांची कास धरली. मात्र यासाठी त्यांना कर्मठ जातीव्यवस्थेवर विश्वास ठेवणार्‍यांकडून मोठ्या त्रासाला देखील सामोरं जावं लागलं.

सावित्रीबाई फुले जयंती 2021

सुप्रिया सुळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

प्रकाश आंबेडकर

पूनम महाजन

बाळासाहेब थोरात

सावित्रीबाईचं जीवन मोठं कष्टाचं होतं. समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्यासोबत संसार करता करता त्यांनी समाजसेवेचं व्रत देखील स्वीकारलं होतं. स्वतः शिक्षण घेऊन त्यांनी समाजातील मुलींना, स्त्रियांना शिक्षणांसाठी प्रवृत्त केलं. त्यांच्यासाठी शाळेची कवाडं खुली केली आणि त्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका ठरल्या.