Sankashti Chaturthi January 2 Moonrise Timings: कोणत्याही चांगल्या, शुभ कामाची सुरूवात गणपती बाप्पाची आराधना करून करण्याची हिंदू धर्माची पद्धत आहे. यंदा नववर्ष 2021 ची सुरूवात झाल्यानंतर दुसर्याच दिवशी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. यंदा जानेवारी महिन्यात दोन वेळेस संकष्ट चतुर्थी आहे. पहिली संकष्ट चतुर्थी 2 जानेवारी तर दुसरी चतुर्थी 31 जानेवारीला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी हा महिना खास आहे. सामान्यपणे संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मंदिरामध्ये गणपती चं दर्शन घेतात. तर काही जण या दिवसाच्या निमित्ताने उपवास ठेवतात. संकष्टीचा हा उपवास चंद्रोदयानंतर सोडण्याची प्रथा आहे. मग आज तुमचा देखील संकष्टीचा उपवास असेल तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेमकी चंद्रोदयाची वेळ काय आहे? Sankashti Chaturthi Special Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!
दर महिन्यात संकष्टी चतुर्थीचं आणि विनायकी चतुर्थी चं वर्त असतं. सामान्यपणे विनायकीचं व्रत मध्यान्ह च्या वेळेस म्हणजे दुपारी 12 वाजता सोडलं जातं. पण संकष्टी ही चंद्रोदयानंतर सोडली जाते त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. चंद्राला अर्घ्य देऊन गणरायाची आरती करून उपवास सोडला जातो. यावेळेस बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्यामध्ये समावेश केला जातो.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ काय?
मुंबई - रात्री 9.16
पुणे - रात्री 9.12
नागपूर - रात्री 8.46
नाशिक - रात्री 9.10
रत्नागिरी- रात्री 9.17
दरम्यान संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंद फूल अर्पण करून पूजा केली जाते. गणेश स्त्रोत्राचे पठण केले जाते. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी धन, आरोग्य, सौख्य यांच्या कृपावृष्टीसाठी हे व्रत केले जाते.