Lok Sabha Elections 2019: माढा लोकसभा मतदार संघातून संजय शिंदे आणि उस्मानाबाद मधून राणा पाटील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा
शरद पवार (Photo credit : Youtube)

शरद पवार (Sharad Pawar)  यांनी माढा लोकसभा मतदार (Madha) संघातून माघार घेतल्यानंतर या जागेवरून राष्ट्रवादीच्या (NCP)  तिकीटावर कोण लढणार? याबाबत उत्सुकता होती. आज शरद पवारांनी संजय शिंदे हे माढा येथून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असतील याची घोषणा केली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बारामतीमध्ये ही घोषणा करताना शरद पवारांनी संजय शिंदेंसोबत उस्मानाबाद येथून राणा पाटील (Rana Patil) यांच्या नावाची घोषणा केली आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक

शरद पवार यांचे ट्विट

राष्ट्रवादी पक्षाचे दोन नवे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो आहे असं म्हणत संजय शिंदे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर राजकीय खेळी खेळताना शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात राणा पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Lok Sabha Election 2019: शिवसेना पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील या दोन नव्या चेहर्‍यांना संधी; पहा कोणाचं तिकीट कापलं

काही दिवसांपूर्वी शरद पवार स्वतः माढा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार होते. मात्र यंदा पहिल्यांदा त्यांचा नातू आणि अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तसेच बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याने पवारया एकाच कुटुंबातून किती उमेदवार रिंगणात उतरवावे? असा प्रश्न विचारत शरद पवारांनी यंदा निवडणूकीतून माघार घेतली आहे.