Ranjitsinh Mohite-Patil (Photo Credits: Facebook)

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजपातील प्रवेशांतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित भाजपात (BJP) प्रवेश केला. वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) गरवारे क्लबमध्ये हा पक्ष प्रवेशाचा सोहळा प्रचंड समर्थकांच्या गर्दीत पार पडला.

मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याचे यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

रणजितसिंह मोहिते-पाटील माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळेस जाहीर केले. तसंच माढ्याचा खासदार भाजपचाच होणार असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्तवला.

भाजपा महाराष्ट्र चे ट्विट:

सुजय विखे पाटलांनंतर लगेचच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. रणजितसिंग मोहिते पाटील यांची भाजपा पक्ष प्रवेशाची घोषणा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या प्रवेश

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदारसंघातून खासदार असून आता मुलगा माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.