Lok Sabha Election 2019: रणजितसिंग मोहिते पाटील यांची भाजपा पक्ष प्रवेशाची घोषणा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या प्रवेश
काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ रणजितसिंह यांचा भाजपाप्रवेश हा महाआघाडीला दुसरा मोठा धक्का समजला जात आहे.
रणजितसिंग मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी भाजपा पक्ष प्रवेशची घोषणा करून आज राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. माढा (Madha) येथील लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणूक(Lok Sabha Election) लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र राष्ट्रवादीकडून (NCP) याबाबतची चिन्ह दिसत नसल्याने त्यांनी भाजपाची वाट धरली आहे. आज कार्यकत्यांसमोर भाषण करताना याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. उद्या 12.30 च्या सुमारास रणजितसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) वरच्या गरवारे क्लबमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ रणजितसिंह यांचा भाजपा प्रवेश हा महाआघाडीला दुसरा मोठा धक्का समजला जात आहे. राष्ट्रवादीला पार्थ पवार चालतात मग रणजित दादा का नको? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. तर रणजितसिंह यांचा भाजपा प्रवेशाला पाठिंबा असल्याची माहिती त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे. सोलापूर: राष्ट्रवादीच्या गडाला हादरा; रणजितसिंह मोहिते पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश
विजयसिंह मोहिते पाटील हे माढाचे खासदार आहेत. आगामी निवडणूकीमध्ये माढा मतदार संघातून रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाकडून निवडणूक लढतील.
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2019 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

