Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक
Lok Sabha Election 2019 (Representational Image (Photo Credits: PTI)

Lok Sabha Election 2019 Maharashtra: निवडणूक आयोयाने आज 17 व्या लोकसभेसाठी निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  11,18,23 आणि 29 एप्रिल यादिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.  मुंबईमध्ये 29 एप्रिल दिवशी मतदान (Mumbai Loksabha Election Date) होणार आहे.  Lok Sabha Election 2019: व्हीव्हीपॅट यंत्र, APP द्वारा तक्रार, मतदार संख्येत वाढ - पहा लोकसभा निवडणूक 2019 ची '8' वैशिष्ट्य काय?

11 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान)

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ - वाशिम

18 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान)

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर, सोलापूर

23 एप्रिल 2019  (महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान)

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान)

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी

 

महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर निवडणुका होणार आहेत.  सध्याच्या सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019  दिवशी संपणार आहे.