राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री पदी अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी आज सकाळी-सकाळी पार पडला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र उचललं. मुख्यमंत्री शपथविधी होता की...? दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी आटोपला, असा उपरोधिक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (हेही वाचा - अजित पवार यांना जनता रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही; मुख्यमंत्री पदाचा शपथविधी म्हणजे रात्रीच्या वेळेतील व्यभिचार: संजय राऊत)
संजय राऊत ट्विट -
महाराष्ट्राच्या मन की बात pic.twitter.com/vq8rXIipv1
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2019
आम्ही बिनधास्त आहोत pic.twitter.com/cB4QNSRRzg
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2019
संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या प्रतिक्रियेत 'आम्ही बिनधास्त असल्याचं म्हटलं होत. यात त्यांनी बाळासाहेबांचा फोटो शेअर करत, संघर्षाचा काळ कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षातून दिसतीय ती शिवसेना उभी राहिली, संघर्षातूनच ती पूढे जाईल.