Maharashtra Minister for Animal Husbandry Sunil Kedar | Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश या भागात शेकडो पक्षी मेल्याने avian influenza ची दहशत पसरायला सुरूवात झाली आहे. दरम्यान त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांनी कामकाज करायला सुरू केली आहे. अशामध्येच काल ठाणे नजिक काही पक्षी मृतावस्थेमध्ये आढळले आणि हा Avian Influenza महाराष्ट्रातही पोहचला की काय? अशी शंका अनेकांच्या मनात आली. पण आज (7 जानेवारी) महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Maharashtra Minister for Animal Husbandry Sunil Kedar) यांनी दिलेल्या माहितीनुसार या मृत पक्षांच्या सॅम्पलचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यांची बर्ड फ्लू चाचणी निगेटीव्ह आली आहे. मात्र असे असले तरीही राज्य सरकार याबाबत दक्ष आहे. Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव.

ठाणे महानगरपालिका आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (6 जानेवारी) सकाळी हिल गार्डन, कोकणीपाडा आणि विजय गार्डन सोसायटी, कावेसर मध्ये 10-12 पक्षी मृतावस्थेत आढळले. मृत पक्ष्यांमध्ये 14 हर्न्स (लांब पायाचा बगळा) आणि कमीतकमी एक पॅराकीट (लांब शेपूट असलेला पोपट) यांचा समावेश होता. Bird Flu: भारतात बऱ्याचदा बर्ड फ्लू चा आजार येतो कसा? जाणून घ्या कारण.

ANI Tweet

एवियन इन्फ्लूएंजा वायरस (Avian Influenza Virus) H5N1 हे बर्ड फ्लूचे सर्वात मोठे कारण मानले जाते. एच 5 एन 1 हा असा एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो मानवांना संक्रमित करतो. हा विषाणू पक्षी तसेच मानवांसाठी खूप धोकादायक आहे.

एकीकडे कोरोना वायरसचं संकट असताना आता एवियन इन्फ्लूएंजा वायरसच्या धुमाकूळामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन पुन्हा अलर्ट झालं आहे. हा रोग कोंबडीची आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी निकटतेमुळे होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणं, योग्यरित्या न शिजवलेले मांस खाणं टाळणं फायद्याचं असल्याचं सांगितलं जात आहे.