Sambhaji Chhatrapati | (Photo Credits: Twitter)

प्रवेशाच्या चिंतेतून उस्मानाबादच्या एका मराठा विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली. अद्याप काही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटवरुन आपली संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. "आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा," अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी केले आहे. (उस्मानाबाद: अपेक्षित कॉलेजला अॅडमिशन मिळेल की नाही या चिंतेतून विद्यार्थ्याची आत्महत्या)

उस्मानाबाद येथील अक्षय शहाजी देवकर (16) या मुलाला दहावीत 94.20% गुण मिळूनही अपेक्षित कॉलेजमध्ये अॅडमिशन न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांचे ट्विट्स:

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी शेतकरी आत्महत्येकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

एकमागून एक ट्विट करत त्यांनी सध्याची समाज्यातील परिस्थिती समोर मांडली आहे.

इतकंच नाही तर त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

मला कोणत्याही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. मात्र या मुलाने आत्महत्या का केली, यासाठी चिंतन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शिक्षण मोफत मिळावं, हा शाहु महाराजांचा विचार समाज्यात उतरवण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.